मी प्रा.महेंद्र गणपुले :

     मी मुळचा पंढरपूरचा १९८८ पासून बोरी खुर्द (जि.पुणे) येथे देव हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक म्हणून काम करीत आहेत. लहानपणापासून मला कला क्षेत्राची आवड आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना १९८५ मध्ये सातारा येथील युथ फेस्टिवलमध्ये एकपात्री उत्कृष्ट अभिनयात प्रथम क्रमांक मिळविला होता. त्यावेळी माजी मुख्यमंत्री (कै.) वसंतदादा पाटील यांच्या हस्ते मला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते.
      १८८५ पासूनच व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले. ऑल इंडिया मिमिक्री नाईट या कार्यक्रमातून संपूर्ण भारतभर कार्यक्रम केले. मोहनकुमार भंडारी यांच्या एन्टरटेनर्स या ऑर्केस्ट्रात सिनेस्टार सचिन, अरुण गोविल, वर्षा उसगावकर, सोनू निगम यांच्यासह अनेक कार्यक्रम केले. हा प्रवास खूप रोमांचकारी आहे.

हास्यनगरीची निर्मिती :

"वो शोला ही क्या,
जो भडकना न जाने |
वो जीवन ही क्या,
जो हसना ना जाने |"
     माणसाला विरंगुळा हवा असतो. हे ओळखून विनोदाला प्राधान्य देऊन मी एकपात्रीची रचना केली. ज्याला नाव दिले "हास्यनगरी". हास्यनगरी हा नकला, विनोद, साऊंड, इफेक्ट्स, विडंबन यांचा एकपात्री कार्यक्रम आहे. चित्रपट कलाकारांच्या नकला, प्रवासातील गमती जमाती, चित्रपटातील बदलते गीत-संगीत, संगीत-नृत्य प्रकारावर कार्यक्रम, क्रिकेट अॅक्शन रिप्ले, रेल्वे साऊंड इफेक्ट, सनई, डिस्को-ह्रिदम, ढोलकीच्या तालावर घुंगरांचा आवाज हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे.
     

हास्यनगरीची घोडदौड:

       हास्यनगरी या कार्यक्रमाची 'विंग्ज' कंपनीतर्फे कॅसेट प्रकाशित झाली आहे. या कॅसेटचे प्रकाशन जेष्ठ साहित्यिक द.मा.मिरासदार यांच्या हस्ते झाले. रेडीओ आणि टीव्हीवर अनेक कार्यक्रम झाले आहेत.

 

Web Hosting Linux Reseller Hosting